breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिघी पोलीस हद्दीतील ‘या’ हॉटेलमध्ये अवैधरित्या दारु विक्री

पिंपरी |महाईन्यूज|

दिघी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडमुखवाडीतील द्वारका फॅमिली गार्डन रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये अवैधरित्या दारु विक्री सुरु होती. परंतु दिघी पोलिसांना हा प्रकार माहीत नव्हता. पोलिसांच्याच सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. येथून विदेशी दारुच्या साठ्यासह एकूण 50 हजारांचा मुद्‌देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी हॉटलचे चालक मालक शाम तापकीर आणि संतोष जाधव या दोघांवर दिघी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 11 ग्राहक व त्यांना सेवा देणारे चार वेटर अशा एकूण 15 जणांवर प्रत्येकी 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वडमुखवाडीतील द्वारका फॅमिली गार्डन रेस्टॉरंटमध्ये अवैधरित्या दारु विक्री होत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या हॉटेलवर सोमवारी (दि.9) छापा मारला. यामध्ये शाम तापकीर व संतोष जाधव हे या हॉटेलमध्ये 15 जणांना एकत्र बसवून, अवैधरित्या दारु विक्री करताना आढळून आले. या छाप्यात हॉटलेमध्ये 10 हजार 240 रुपये रोख रक्कम, 39 हजार 499 रुपये किंमतीच्या विदेशी दारु व बिअरच्या बाटल्या असा एकूण 49 हजार 739 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button