breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप व उन्नती फाऊंडेशनच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कोरोनायोध्यांचा सन्मान

पिंपरी / महाईन्यूज

कोरोनाकाळात सामाजिक योगदान देणा-या डॉक्टर्स, नर्स व तत्सम पॅरामेडिकल स्टाफसह सफाई कामगार, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सर्व्हे करणारे पिंपळे सौदागर येथील प्रतिनिधी अशा व्यक्तींचा पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिका-यांनी या कोरोना योध्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कौतुक सोहळा पार पडला.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेविका उषा मुंडे, उन्नती सोशल फॉउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, उन्नती सोशल फॉउंडेशनच्या अध्यक्षा तथा चिंचवड विधानसभा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा कुंदा भिसे, उपाध्यक्षा कांचन काटे, सामाजिक कार्यकर्ते विकास काटे, अतुल पाटील, भाजपचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, तसेच पिंपळे सौदागर येथील मान्यवर आदी उपस्थित होते.

पिंपळे गुरव येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या महिला सभासदांनी कोरोना काळात ज्या नागरिकांना भोजन वाटप केले. त्यासाठी नगरसेविका उषा मुंडे, ज्योती कोळी, मनीषा हंगरगे, संगीता रावते, सुनिता कुवर, कल्पना शिंदे यांनी योगदान दिले. सुनील देवकर, शिवाजी निम्हण, प्रकाष कांबळे यांनी बाजारातील साहित्य पुरवठा करणे, तयार अन्न नागरीकांपर्यंत पोहोचविणे, त्याचे व्यवस्थित वाटप करणे अशी कामे केली.

डॉ. दिनेश फोंगसे हे कोरोना काळात ज्यांना घराबाहेर पडता येत नाही, उदा. ज्येष्ठ नागरिक अशा व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांची सेवा केली. सतिष कांबळे हे ज्या नागरिकांना दवाखान्याची माहिती नाही, त्यांना दवाखान्यात घेऊन जाणे, एखाद्याचे बिल कमी करून देणे, बेड उपलब्ध करून देणे यासह अनेक गरजा भागविल्या. योगेश चौधरी यांनी उन्नति फाउंडेशनसोबत कार्य करत जबाबदारी पार पाडली. अतुल पाटील यांनी प्रस्ताविक केलं. तर, विकास काटे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button