पुस्तकांच्या झेरॉक्स विकल्या प्रकरणी चौघांवर कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा
पिंपरी l प्रतिनिधी
पुस्तकांच्या झेरॉक्स कॉपी काढून त्या विकल्या. तसेच काही पुरस्कांच्या सॉफ्ट कॉपी संगणकात ठेवल्या. याबाबत चार जणांच्या विरोधात कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 26) दुपारी दीड वाजता पॅराडाईज कॉपी एंड स्टेशनरी आणि ओम साई कॉपीअर्स संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडला.
गणेश बाबुभाई परमार (राजपूत) (वय 26, रा. पिंपरी), घनशाम बाबुभाई परमार (वय 25, रा. पिंपरी), रियाजखान मोहम्मदइलियास खान (वय 31, रा. पिंपरी), भास्कर शिवाजी दुधभाते (वय 32, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रवींद्र विठ्ठल वाणी (वय ५१, रा. प्रभात रोड, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा टेक्निकल पब्लिकेशन नावाने पुस्तके पब्लिश करण्याचा व्यवसाय आहे. त्याचा ट्रेडमार्क आणि व्यापारचिन्ह त्यांनी रजिस्टर केले आहे. फिर्यादी यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ सीबीएस टी ई (कॉम्पुटर इंजिनिअरिंग) सेमिस्टर सहा या करीता अनुराधा ए पुणतांबेकर यांनी लिहिलेले वेब टेक्नोलॉजी या नावाने पुस्तकाची पहिली आवृत्ती फेब्रुवारी 2022 मध्ये प्रकाशित केली आहे. त्याची किंमत 595 रुपेय एवढी आहे.
असे असताना आरोपींनी या पुस्तकाच्या दहा प्रती त्यांच्या झेरॉक्स मशीनवर झेरॉक्स काढून तसेच त्यांच्या दुकानातील संगणकात विविध शैक्षणिक पुस्तकांच्या सॉफ्ट कॉपी, हार्ड डिस्कमध्ये जतन करून कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.