breaking-newsमहाराष्ट्र

दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण: भरत कुरणे एसआयटीच्या ताब्यात

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी अटक झालेल्या भरत कुरणेला कोल्हापूर एसआयटीने शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले. भरत कुरणेचा डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याने कोल्हापूर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने भरत कुरणेला बेंगळुरु पोलिसांकडून ताब्यात घेतले.

ऑगस्ट महिन्यात गौरी लंकेश हत्याप्रकरणात बेळगावमधील भरत कुरणे याला पोलिसांनी अटक केली होती. तो बेंगळुरुत न्यायालयीन कोठडीत होता. बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यावरील चिखले या गावात भरत कुरणेचे रिसॉर्ट होते. या रिसोर्टमध्ये गौरी लंकेशसह नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी या विचारवंतांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. या चारही हत्यांचा सूत्रधार अमोल काळे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

कोल्हापूरमधील एसआयटीने भरत कुरणेचा ताबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु केले. अखेर शनिवारी कोल्हापूर एसआयटीने भरत कुरणेला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. याबाबत अद्याप कोल्हापूर पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button