breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘दोषी विनय मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त’, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी विनय शर्माचा आणखी एक प्रयत्न अपयशी ठरला आहे. राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत विनयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. स्वतःला मनोरुग्ण सांगत फाशी टाळण्याची त्याने मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने विनय मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे सांगितले. न्यायालयाने सुनावणीनंतर निर्णय सुरक्षित ठेवला होता. न्या. अशोक भूषण आणि ए एस बोपण्णा यांच्यासह न्या. आर भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निर्भया प्रकरणातील चार दोषींपैकी एक विनय शर्माच्या याचिकेवरील निर्णय सुरक्षित ठेवला होता. ज्यामध्ये त्याने राष्ट्रपतींकडून त्याच्या दया याचिकेच्या अस्वीकृतीस आव्हान दिले होते.

सर्वोच्च न्यायालयात दोषी विनय शर्माचे प्रतिनिधीत्व करणारे वकील ए पी सिंह यांनी आपल्या पक्षकाराची दया याचिका फेटाळण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला होता. यावर न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी टीका केली होती. तुषार मेहता हे या प्रकरणात केंद्राची बाजू मांडत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button