breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दळवीनगरच्या आगीतील अत्यावस्त कुटूंबियांना राष्ट्रवादीचा मदतीचा हात

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिंचवड, दळवीनगर येथे गुरुवारी (दि. 24) आग लागून झालेल्या दुर्घटनेत दोन व्यक्तींचा जागीच मृत्यु झाला. तर, सहा झोपड्या जाळून खाक झाल्या. यामध्ये या सहा कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. पिंपरी-चिंचवड शहर महिला राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या अध्यक्षा वैशाली काळभोर आणि पदाधिका-यांच्या वतीने या दुर्घटनेतील कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्य व किराणामाल देऊन मदतकार्य करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने घरातील नवे-जुने कपडे, भांडी, धान्य, भाजीपाला आणि इतर वस्तू एकत्रित करुन या कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. आगीच्या दुर्घटनेमुळे या परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी महावितरण अधिका-यांशी संपर्क साधून येथील वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. तसेच, या कुटूंबियांना पंतप्रधान आवास योजना किंवा इतर घरकुलसारख्या प्रकल्पांतून कायमस्वरुपी घरे मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्न करील, असे वैशाली काळभोर यांनी सांगितले आहे.
यावेळी महिला राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनीषा गटकळ, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्षा पौर्णिमा पालेकर, शीला भोंडवे, माजी नगरसेविका शमीम पठाण, सिंधु पांढरकर, उपाध्यक्षा सुप्रिया पवार, प्रदेश सरचिटणीस मीनाक्षी उंबरकर, सविता धुमाळ, मेधा उमखकर, लता पिंपळे, विजया काटे, पियू सहा, प्रमिला जगताप, सुनीता काळोखे, कांता भालेकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button