breaking-newsपुणे

‘दगडूशेठ’च्या श्रींसमोर अथर्वशीर्ष पठणाची परंपरा कायम

पुणे – यंदा गणपती उत्सवावर कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचं संकट असलं तरी भाविकांचा उत्साह, श्रद्धा मात्र कायम आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर दरवर्षी ऋषीपंचमीच्या दिवशी अथर्वशीर्ष पठणाचा सोहळा असतो. यावर्षीही ही प्रथा कायम आहे. यंदाही ‘ओम नमस्ते गणपतये…’चे स्वर ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर निनादले. दरवर्षी हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारा सोहळा, यंदा दगडूशेठच्या मुख्य मंदिरात अवघ्या ५ महिलांच्या उपस्थितीत पार पडला. तर, हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १२८व्या वर्षी, ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा मुख्य मंदिरात प्रत्यक्षपणे पाच महिलांचीच उपस्थिती होती. शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या ५ महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग १० वर्षे या उपक्रमात सहभाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचं ३४वं वर्ष आहे.

अथर्वशीर्ष पठणाचा प्रारंभ सकाळी ६ वाजता शंख वादनाने झाला. ओमकार, गीत, गजर यांसह मंदिरात उपस्थित महिलांनी श्री गणराया चरणी अथर्वशीर्ष पठण केलं. तसंच गणेशाची आरती देखील करण्यात आली.

उत्सवकाळात मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. मंदिरा बाहेरुन दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुलं, पेढं, नारळ देखील स्वीकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये आणि ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button