breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

दक्षिण अमेरिकी 14,861 आराेग्य कर्मचारी बाधित, 179 मृत्यू

ब्राझिलिया | दक्षिण अमेरिकी देश ब्राझीलमध्ये काेराेनामुळे एका दिवसात सर्वाधिक ११७९ जण मृत्युमुखी पडले. तत्पूर्वी सर्वाधिक ८८१ रुग्णांचा १२ मे राेजी मृत्यू झाला हाेता. काेराेनाने सर्वाधिक पीडित असलेला ब्राझील जगातील चाैथ्या क्रमांकाचा देश आहे. आतापर्यंत ब्राझीलमध्ये २ लाख ७१ हजार ८८५ रुग्ण आढळून आले आहेत, तर १७ हजार ९८३ एकूण रुग्णांना प्राण गमवावे लागले.

ब्राझील नर्सिंग आॅब्झर्व्हेटरीच्या मते, देशात १४ हजार ८६१ आराेग्य कर्मचारी बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक १०९ महिला आराेग्य कर्मचारी आहेत. साआे पावाेलाे येथील परिचारिका विवियन कॅमार्गाे म्हणाल्या, आम्हाला पीपीई किट मिळाले नाही. बहुतांश परिचारिकांना हे किट परिधान करण्याविषयीची माहिती नाही. त्यानंतरही त्या सर्रास त्याचा वापर करतात आणि काेराेना पाॅझिटिव्ह हाेत आहेत. ब्राझील फेडरल काैन्सिल आॅफ नर्सेसच्या सदस्य वालकिरियाे अल्मेडिया म्हणाले, काही रुग्णालयांत कर्मचारी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एकाच किटचा वापर करतात. त्यातूनही प्रादुर्भाव हाेताे. बाधित कर्मचाऱ्यांत ६० वर्षांहून जास्त वयाचे लाेकही आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button