breaking-newsक्रिडा

थुंकीच्या वापराबाबत अनिल कुंबळे यांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होताना दिसतो आहे. क्रिकेटच्याही निमयामध्ये बदल करण्यात येत आहे. बॉलला चमक आणण्यासाठी थुंकीचा वापर करण्यावर प्रतिबंध आणणं ही उपाययोजना असून कोरोना व्हायरसची स्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा गोष्टी सामान्य होणार असल्याचं मत आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांनी मांडलं आहे. 

कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी कुंबळे यांच्या नेतृत्त्वाखालील समितीने थुंकीच्या वापरावर प्रतिबंध घालण्याची मागणी केली आहे. आयसीसीने शुक्रवारी क्रिकेट पुन्हा सुरु करण्याबाबत आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये यावर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान मॅचदरम्यान बॉलवर थुंकी लावण्याच्या वापरावरील बंदीबाबत अनिल कुंबळे यांनी स्पष्टीकरण देत हा निर्णय तात्पुरता असून कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यनंतर पुन्हा जुने नियम लागू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. बॉलला चमक आणण्यासाठी वॅक्ससारख्या गोष्टीला परवानगी द्यावी की नाही याबाबतही आयसीसीकडून चर्चा सुरु आहे.

बाहेरील पदार्थाच्या वापरावर चर्चा झाल्याचं कुंबळे यांनी सांगितलं. जर खेळाचा इतिहास पाहिला तर आपण टीकाकार ठरलो आहोत आणि बाहेरील पदार्थांचा खेळादरम्यान वापर होऊ नये याकडे आपलं अधिक लक्ष असल्याचंही कुंबळे यांनी सांगितलं. त्याशिवाय याबाबत बोलताना कुंबळे यांनी 2018 मध्ये झालेल्या बॉलच्या छेडछाड प्रकरणाविषयीही आठवण करुन दिली. या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू स्टीव स्थिम, डेविड वॉर्नर आणि बेनक्राफ्ट यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button