breaking-newsआंतरराष्टीयक्रिडा

थायलंडच्या गुहेत अडकलेल्या ६ मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

चियांग राय : थायलंडच्या एका गुहेत अडकलेल्या १२ पैकी ६ मुलांना बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले आहे. गुहेत अडकलेले १२ खेळाडू आणि एका प्रशिक्षकाला वाचण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. १३ विदेशी पाणबुडे आणि थायलंडच्या नौदलाचे ५ कमांडो या मुलांना बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. प्रत्येक मुलासाठी दोन पाणबुडे तैनात करण्यात आले आहे.

सर्व मुले बाहेर काढण्यासाठी किमान २ ते ४ दिवस लागू शकतात, अशी माहिती या मोहिमेत सहभागी एका लष्कराच्या कमांडरने दिली. बचाव पथकाने आपल्या योजनेची अनेकवेळा रंगीत तालीम घेतली होती. जर आम्ही वाट पाहत राहिलो आणि जर पुन्हा एकदा पाऊस पडू लागला तर इतक्या दिवस पाणी काढण्यासाठी केलेली आमची मेहनत वाया जाईल, असे या मोहिमेच्या प्रमुखांनी सांगितले. ते म्हणाले, परिसरात पाणीपातळी वाढू शकते. जिथे मुले बसले आहेत. तो फक्त १० वर्ग मीटर इतका राहिला आहे. हवामान विभागाने देशात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यात मुलांना वाचवणे कठीण जाणार आहे.

तत्पूर्वी, चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत १५ दिवसांपासून फुटबॉल टीम अडकली आहे. या टीममध्ये ११ ते १६ वयोगटातील १२ मुलं आणि त्यांचा २५ वर्षांचा प्रशिक्षकदेखील आहे. थाय अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी बचाव मोहिमेला सुरूवात झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. या मुलांना कशाप्रकारे बाहेर काढता येईल याची पूर्ण माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. पोहत गुहेबाहेर येण्यावाचून या मुलांकडे कोणताही पर्याय नाही. यातल्या एकाही मुलाला पोहता येत नाही त्यामुळे या मुलांना पोहोण्याचं प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. आता या खडतर प्रवासाला सुरूवात झाली आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button