breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

थरार! समोरासमोर एकाच रुळावर आल्या दोन लोकल…

मुंबई | महाईन्यूज

हार्बर मार्गावरील नेरुळ-सीबीडी बेलापूर स्थानकादरम्यान एकाच रुळावर दोन लोकल समोरासमोर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर ‘लोकलचा अपघात होता होता टळला’, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, काही वेळातच या लोकल समोरासमोर येण्यामागील सत्य समोर आलेले आहे. 

बेलापूर ते खारघर स्थानकादरम्यान डाऊन मार्गावरील रुळाला तडे गेल्यामुळे लोकलची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती. त्यामुळे साहजिकच मार्गावर एका पाठोपाठ एक लोकलच्या रांगा दिसून आल्या होत्या. हे पाहिल्यानंतर दोन विरुद्ध दिशेच्या लोकल समोरासमोर आल्यासारखे वाटले. त्यानंतर काहींनी या घटनेचे फोटो काढून सोशल मीडियात व्हायरल केले आणि लोकलचा अपघात होता होता टळला असे पसरवले. मात्र, रेल्वे प्रशासनाने असे काही घडले नसल्याचे म्हटलेले आहे.  रेल्वे प्रशासनाकडून रुळाची दुरुस्ती करण्यात आली असून या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत केलेली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button