breaking-newsराष्ट्रिय

‘त्या’ प्रश्नांचीच उत्तरे मोदी देतात!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लिखित मुलाखती देत असतात, मात्र त्यांनी वास्तववादी प्रश्नांना उत्तरे दिली तर ते आपल्या सर्वासाठीच लज्जास्पद ठरेल, असा हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर चढविला.मोदी सिंगापूरला गेले होते तेथे त्यांनी नायनांग तांत्रिक विद्यापीठात दिलेल्या मुलाखतीच्या संदर्भाने राहुल गांधी यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. मोदी यांनी हिंदी भाषेतून उत्तर दिल्यानंतर दुभाष्याने त्यांचे उत्तर वाचून दाखविले त्यामुळे उत्तर पूर्वनियोजित होते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

भाषांतर करणाऱ्याने आधीच उत्तरे लिहिली होती असे प्रश्न उत्स्फूर्तपणे स्वीकारणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. मोदी यांनी वास्तववादी प्रश्न स्वीकारले नाहीत हे सुदैव, तसे झाले असते तर ते आपल्या सर्वासाठीच लज्जास्पद ठरले असते, असे गांधी यांनी ट्वीट केले आहे.

Rahul Gandhi

@RahulGandhi

The first Indian PM who takes “spontaneous” questions that the translator has pre-scripted answers to!

Good that he doesn’t take real questions. Would have been a real embarrassment to us all if he did.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button