breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘त्यावरून’ भाजपाला कारवाई करायची असेल तर करू द्या – उद्धव ठाकरे

मुंबई:  पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सध्या सुरू असलेले द्वंद्व दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक सनसनाटी ऑडिओ क्लिप उपस्थितांना ऐकवली. या प्रकरणी भाजपा कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपाकडून कारवाईची भाषा वापरण्यात आल्याने शिवसेनेने देखील आता कोणतीही कारवाई झाली तर त्याला सामोरे जाण्याचा मानस केला आहे.

भाजपाला जर कारवाई करायची असेल तर करू द्या, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच, ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांचा आवाज आहे, तो समोर आणला. कुटनीती, साम-दाम-दंड-भेदचा अर्थ काय?, अर्थ समजण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडून मराठी शिकण्यास तयार आहोत, अशी शब्दांत हल्लाबोल चढवत  उद्धव ठाकरे यांनी क्लिपमध्ये कशा प्रकारे छेडछाड झाली तेदेखील उडघ करावं, असं आव्हानदेखील भाजपाला दिलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button