breaking-newsमहाराष्ट्र

अजिंठा-वेरुळ येथे जागतिक बुद्धिस्ट परिषदेचे आयोजन

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध अजिंठा व वेरुळ येथे दिनांक २२ ते २५ ऑगस्ट २०१८ दरम्यान जागतिक बुद्धिस्ट परिषद होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

रावल यांनी महाराष्ट्रात प्रथमच जागतिक बुद्धिस्ट परिषद होणार असल्याचे सांगितले. ही परिषद यावर्षी  दिनांक २२ ते २५ ऑगस्टदरम्यान युनेस्कोचा दर्जा प्राप्त असलेल्या औरंगाबाद येथील अंजिठा-वेरूळ लेण्यांच्या ठिकाणी होणार असल्याचे सांगितले. यापूर्वी जागतिक बुद्धिस्ट परिषद ही उत्तर प्रदेश आणि बिहार येथे होत असे. जागतिक बुद्धिस्ट परिषदेत जगातील बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधित्व असेल. किमान २५ राष्ट्रे या परिषदेत सहभागी होतील असे रावल यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button