breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे निलख येथे नैसर्गिक रंगांची उधळण करत होळी मिलन व रंगोत्सव साजरा

माजी नगरसेविका आरती चोंधे, संकेत चोंधे यांचे आयोजन

पिंपरी | प्रतिनिधी

विशालनगर, पिंपळे निलखमधील चोंधे-पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे माजी नगरसेविका आरती चोंधे, भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या वतीने होळी मिलन व रंगोत्सव साजरा करण्यात आला. सर्वांनी नैसर्गिक रंगांची उधळण करत पाण्याचा वापर न करता धुलिवंदन साजरे केले.

माजी नगरसेविका आरती चोंधे व भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संकेत सुरेश चोंधे यांच्या वतीने ढोल ताशा संगीत सहित होळी मिलन व रंगोत्सव 2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी (दि. 18) झालेल्या या कार्यक्रमासाठी परिसतील सुमारे 200 महिलांनी व युवकांनी सहभाग घेतला.

संगीत होळी मिलन व रंगोत्सवाच्या कार्यक्रमात नैसर्गिक कोरड्या रंगांचा वापर करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचे महत्व पटवून देण्यात आले. आरती चोंधे व संकेत चोंधे यांनी प्रभागातील सर्व नागरिकांना धुलिवंदनच्या शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button