breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल, रिकाम्या खुर्च्यांपुढे पिंपरीच्या आमदारांनी ठोकले भाषण

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या सोमवारी (दि. 21) मतदान होत आहे. त्यामुळे कालच प्रचार थांबलेला असताना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. पिंपरी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार एड. गौतम चाबुकस्वार यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ आचारसंहितेचे उल्लंघन करत व्हायरल होत आहे. त्याचा चाबुकस्वारांच्या मतांवर परिणाम पडेल, असे विरोधकांना कदाचीत वाटत असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उद्या मतदान होणार असल्याने निवडणूक विभागाच्या नियमानुसार शनिवारी (दि. 19) सायंकाळी पाच वाजता सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार तोफा थंडावल्या. निवडणूक विभागाने प्रचाराला आळा घातला असला तरी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह प्रचारपूरक पोस्ट अद्यापही व्हायरल होताना दिसत आहेत. त्या माध्यमावर निवडणूक विभागाला आवर घालता आला नाही. काही दिवसांपूर्वी पिंपरी मतदार संघाचे आमदार एड. गौतम चाबुकस्वार यांची पिंपरीत सभा झाली. त्या सभेला अक्षरशः बोटावर मोजण्याएवढीच लोकं उपस्थित होती. त्यातही चाबुकस्वारांचे भाषण सुरू होताच बसलेल्या महिला, पुरूषांनी सभेतून निघून जाण्यातच धन्यता मानली. हे आयते कोलीत विरोधकांच्या हाती लागले.

चाबुकस्वारांच्या फ्लॉप गेलेल्या सभेचा हा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातून सभेला उपस्थित न राहणारी लोकं चाबुकस्वारांना मतं कशी काय देतील, असे विरोधकांना वाटत असावे. म्हणून त्यांचा हा व्हिडिओ व्हारयल केला जात असावा, असा अंदाज राजकीय क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button