breaking-newsपुणेमहाराष्ट्र

तोंडी तलाक देत पत्नीवर जीवघेणा हल्ला

  • कॅम्प परिसरातील प्रकार : पतीविरोधात गुन्हा

पुणे – तोंडी तलाक दिलेल्या पत्नीवर रॉडने हल्ला करण्यात आला. ही घटना लष्कर परिसरात सोमवारी रात्री घडली. पतीवर लष्कर पोलीस ठाण्यात पत्नीच्या खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्ताख शेख (43, रा. मेंटल हॉस्पिटल क्वॉटर्स, येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी 31 वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे.

फिर्यादी महिला आणि आरोपी मुस्ताख शेख हे पती-पत्नी आहेत. दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असल्याने दहा दिवसांपूर्वी आरोपी मुस्ताख याने फिर्यादींना तोंडी तलाक दिला होता. त्यानंतर फिर्यादी या मुलास घेवून नाना पेठेत माहेरच्या नातेवाईकांकडे रहायला गेल्या होत्या. दरम्यान, मुस्ताख शेख याने मुलाला भेटायचा बहाणा करून पत्नीला मुलासह लष्कर परिसरात बोलावून घेतले. त्यानुसार फिर्यादी सोमवारी रात्री मुलास घेवून गेल्या होत्या. तेथे आरोपी मुस्ताख याने फिर्यादीसोबत असलेल्या जुन्या भांडणावरून वाद उकरून काढला. तुला जास्त मस्ती आली आहे का? असा जाब विचारून त्याने शर्टमध्ये लपवून आणलेला रॉड काढला आणि फिर्यादींच्या डोक्‍यात दोन ते तीन वार करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने केलेल्या हल्ल्यामध्ये फिर्यादी महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष काटे करीत आहेत.

तलाकच्या वादातून पत्नीवर हल्ल्याची दुसरी घटना
तोंडी तलाख दिल्यानंतर पतीकडून पत्नीवर जीवघेणा हल्ला होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाच्या प्रवेशव्दारासमोरही असा प्रकार घडला होता. तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरोधात न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केलेल्या पत्नीवर पतीने रॉकेल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button