breaking-newsराष्ट्रिय

…तेव्हा येडियुरप्पांनी अवघ्या 7 दिवसातच गमावलं होतं मुख्यमंत्रीपद

बंगळूरू : सर्वोच्च न्यायालयात मध्यरात्री रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली.  येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी ते 2007 आणि 2008 मध्ये मुख्यमंत्रीपदी होते.

2007 मध्ये केवळ सातच दिवसात त्यांना मुख्यमंत्रीपद सोडायला लागलं होतं. 2007 ला येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात होत तशीच काहीशी राजकीय परिस्थिती आता देखील आहे. येडियुरप्पा हे 2007 साली पहिल्यांदा सत्तेत आले. त्यावेळी त्यांनी कुमारस्वामी यांच्या जेडीएसला मदत केली होती. भाजप आणि जेडीएसच्या युतीने काँग्रेसच्या धरम सिंह यांच्या सरकराला पराभूत केले होते.

त्यावेळी भाजप आणि जेडीएस यांच्यात करार झाला. त्या करारानुसार आधी कुमारस्वामींना 20 महिने मग येडियुरप्पांना 20 महिने मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं. भाजपच्या मदतीने कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले, तर येडियुरप्पा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले. ऑक्टोबर 2007 मध्ये कुमारस्वामींची 20 महिन्यांची मुदत संपली आणि येडियुरप्पा मुख्यमंत्री होण्याची वेळ आली, तेव्हा कुमारस्वामींनी शब्द फिरवला. येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या येडियुरप्पा आणि त्यांच्या पक्षातील मंत्र्यांनी 5 ऑक्टोबर 2007 ला राजीनामा दिला.

7 नोव्हेंबर 2007 पर्यंत भाजप-जेडीएसने पुन्हा आपापसातील वाद मिटवल्याने राष्ट्रपती राजवट शिथील झाली. जेडीएसने येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. येडियुरप्पांनी 12 नोव्हेंबर 2007 रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. मात्र, मंत्रिपदांवरुन जेडीएस-भाजपमध्ये पुन्हा बिनसलं आणि अवघ्या सात दिवसात 19 नोव्हेंबर 2007 रोजी येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button