breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘तेजस्विनी’ महिला बचत गटाच्या रिटेल शॉपचे उद्घाटन

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “मिशन स्वावलंबन प्रकल्प अंतर्गत बळवंत नगर, बिजलीनगर-चिंचवड येथे बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे व खाद्य पदार्थांच्या विक्रीसाठी  “तेजस्विनी” महिला बचत गट रिटेल शॉपचा उदघाटन समारंभ पार पडला. नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आणि पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माविम पुणेचे वरिष्ठ जिल्हा अधिकारी अर्चना क्षीरसागर, मिशन स्वावलंबन प्रकल्प सल्लागार कनक खरे, मार्केटिंग सल्लागार प्रशांत कवटे, नागरवस्ती विकास योजना विभागाचे सहायक समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे आदी यावेळी उपस्थित होते.

तेजस्विनी रिटेल शॉपच्या माध्यमातून, बचत गटातील महिलांना आपले उत्पादन विक्री करण्याकरिता हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. अशा पद्धतीचे रिटेल आउटलेट योग्य बाजारभाव मिळण्यास उपयुक्त ठरणार आहे. भविष्यात, मिशन स्वावलंबन प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात विविध ठिकाणी “तेजस्विनी” नावाने रिटेल चैन शॉप स्थापित करण्याचे नियोजन आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button