breaking-newsआंतरराष्टीय

तुर्कीतील निवडणूकीत इर्डोगन यांचा मोठा विजय

  • निवडणूक प्रक्रियेबाबत विरोधकांचे आक्षेप

इस्तंबुल – तुर्कीमध्ये झालेल्या निवडणूकीमध्ये अध्यक्ष रेसेप तय्यिप इर्डोगन यांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयामुळे इर्डोगन यांना अध्यक्षपदासाठी आणखीन पाच वर्षांची मुदत मिळणार आहे. याशिवाय गेल्या दिड दशकापासून तुर्कीच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणाऱ्या इर्डोगन यांच्या अधिकारांमध्येही मोठी वाढ होणार आहे. मात्र तुर्कीतील विरोधकांनी मात्र निवडणूक प्रक्रियेवर शंका घ्यायला सुरुवात केली आहे.

निवडणूक निकाल मध्यरात्रीच्या सुमारास जाहीर झाल्यानंतर हजारो समर्थकांसमोर इर्डोगन यांनी आपल्या विजयाचे समर्थन करणारे भाषण केले. “तुर्कीने लोकशाही पद्धतीने सर्व जगाला एक धडा दिला आहे.’ असे ते म्हणाले.
राजकीय विश्‍लेषकांनी वर्तवलेल्या भाकितापेक्षाही इर्डोगन यांना मोठा विजय प्राप्त झाला आहे. त्यांच्या जस्टीस ऍन्ड डेव्हलपमेंट पार्टीला निवडणूकीमध्ये 52.5 टक्के मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या रिपब्लिकन पीपल्स पार्टीच्या मुहर्रेम इन्स यांना 30.7 टक्के मते मिळाली. मात्र या निवडणूकीवर इर्डोगन यांच्याकडून गैरव्यवहार झाल्याचा आरोप इन्स यांनी केला आहे.

या विजयानंतर लगेचच इर्डोगन यांनी 2017 च्या एप्रिल महिन्यातल्या सार्वमतानुसार मान्य केलेली अध्यक्षीय यंत्रणा राबवायला सुरुवात केली आहे. मात्र यामुळे तुर्कीमध्ये एकाधिकारशाहीला सुरुवात होईल, अशी विरोधकांना भीती वाटते आहे.

तुर्कीमध्ये पहिल्यांदाच अध्यक्षीय आणि संसदीय निवडणूका एकाच दिवशी झाल्या. आपल्या सहकारी नॅशनॅलिस्ट मुव्हमेंट पार्टीबरोबर आघाडी करून इर्डोगन यांना बहुमत मिळवणे सहज शक्‍य आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button