breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ताथवडेच्या इंदिरा महाविद्यालयात भारतीय सैनिकांच्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

वाकड – भारतीय लष्कराच्या सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या गाैरवार्थ आणि केंद्रीय आैद्योगिक सुरक्षा दलाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयात 29 व 30 सप्टेंबरला विविध शस्त्रास्त्रे प्रदर्शन आणि त्याच्या वापराच्या पध्दतीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी 300 हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी प्रदर्शनाला भेट देवून माहिती जाणून घेतली.

29 सप्टेंबर 2017 रोजी भारतीय सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्याच्या गाैरवार्थ व केंद्रीय आैद्योगिक सुरक्षा दलाने हे प्रर्दशन भरले होते. या प्रर्दशनात विविध लष्करातील शस्त्रास्त्रे, दुर्बिणी, लांब पल्ल्याची क्षेपणाशस्त्रे आदी प्रदर्शन ठेवले होते. यावेळी त्या शस्त्रास्त्रांची माहिती विद्यार्थ्यांना जवानांकडून देण्यात आली. यावेळी केंद्रीय आैद्योगिक सुरक्षा दलाचे डेप्युटी कमांडर जीवन धीवर, राकेश राजवल, तरुण मलिक यांच्यासह 40 जवानांनी शस्त्रात्रांची योग्य माहिती देवून त्यांची हाताळणी कशा प्रकारे केली जाते याबाबत सर्वांना माहिती दिली. याप्रसंगी प्राचार्य डाॅ. जनार्दन पवार, प्रा. थाॅमसन वर्णसे, प्रा. शिवेंद्र भुषण, प्रा.सुमीत ससाणे, प्रा. अविनाथ शिंगटे, डाॅ. चद्रशेखर पवार, प्रा. शांतीलाल घालमे, प्रा. रविंद्र सर्जे, सुमेध गायकवाड हे उपस्थित होते.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button