ताज्या घडामोडी

…तर माढा, सोलापूर, बारामती आणि सातारा चारही लोकसभा मतदार संघ भाजपला गमवावे लागतील! मोहिते पाटीलांनी ठोकला शडडू

भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला भाजपचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रखर विरोध दर्शविला असून मोहिते पाटील कुटुंबात उमेदवारी न दिल्यास माढा, सोलापूर, बारामती आणि सातारा हे चार लोकसभा मतदार संघ भाजपला गमवावे लागतील असा थेट निर्वाणीचा इशारा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वी मोहिते पाटील कुटुंबाने विद्यमान खासदार निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करीत भाजप नेतृत्वाने निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली.

निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मोहिते पाटील समर्थकांनी या उमदेवारीला विरोध दर्शवित धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला.

भाजप मधील हा अंतर्गत वाद अधिकच पेटल्याने, भाजपचे नेते गिरीश महाजन अकलूज येथे दाखल झाले त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी गुप्त बैठक केली मात्र प्रश्न काही मार्गी लागला नाही. मोहिते पाटील आपल्या मागणीवर ठाम राहिले.

महाजन यांनी काही दमबाजी करण्यापूर्वीच मोहिते पाटील कुटुंबाने आक्रमक भूमिका घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकविण्याने भाजप पुढे पेच निर्माण झाला आहे.

​  

​भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला भाजपचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रखर विरोध दर्शविला असून मोहिते पाटील कुटुंबात उमेदवारी न दिल्यास माढा, सोलापूर, बारामती आणि सातारा हे चार लोकसभा मतदार संघ भाजपला गमवावे लागतील असा थेट निर्वाणीचा इशारा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी दिला आहे. लोकसभा 

भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला भाजपचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रखर विरोध दर्शविला असून मोहिते पाटील कुटुंबात उमेदवारी न दिल्यास माढा, सोलापूर, बारामती आणि सातारा हे चार लोकसभा मतदार संघ भाजपला गमवावे लागतील असा थेट निर्वाणीचा इशारा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वी मोहिते पाटील कुटुंबाने विद्यमान खासदार निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करीत भाजप नेतृत्वाने निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली.

निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मोहिते पाटील समर्थकांनी या उमदेवारीला विरोध दर्शवित धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला.

भाजप मधील हा अंतर्गत वाद अधिकच पेटल्याने, भाजपचे नेते गिरीश महाजन अकलूज येथे दाखल झाले त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी गुप्त बैठक केली मात्र प्रश्न काही मार्गी लागला नाही. मोहिते पाटील आपल्या मागणीवर ठाम राहिले.

महाजन यांनी काही दमबाजी करण्यापूर्वीच मोहिते पाटील कुटुंबाने आक्रमक भूमिका घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकविण्याने भाजप पुढे पेच निर्माण झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button