breaking-newsपुणेमहाराष्ट्र

…तर बीएसएनएल कर्मचारी बेमुदत संपावर

विविध मागण्यांसाठी कार्यालयाबाहेर आंदोलन
 
पुणे – भारतीय दूरसंचार निगमच्या (बीएसएनएल) कर्मचारी व अधिकाऱ्यांना तिसऱ्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी तसेच 4-जी स्पेट्रक्‍म मिळावा, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा फेरआढावा घ्यावा आदी मागण्यांसाठी बीएसएनएलच्या कामगार संघटनांनी एकत्रित येऊन कार्यालयाबाहेर मंगळवारी निदर्शने केली.

राज्यातील बीएसएनएलच्या सर्व जिल्हा परिमंडळ कार्यालयाबाहेर ही निदर्शने करण्यात आली. एक महिन्याच्या आत जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 1 जानेवारी 2017 पासून तिसरा वेतन आयोग लागू करण्याचे आश्‍वासन शासनाने दिले होते. ते लागू करताना संस्थेच्या नफ्याची अटदेखील शिथिल करण्यात येणार होती. मात्र, अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

त्यामुळे आता संघटनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती कामगार संघटनेचे प्रमुख नागेश नलावडे यांनी दिली. बीएसएनएलची शहरात 450 टॉवर आहेत. तर खासगी कंपन्याचे साडेचार हजार टॉवर आहेत. त्यामुळे नेटवर्कची समस्या अधिक जाणवते. ती सोडविण्यासाठी टॉवरची संख्या वाढविण्याची आवश्‍यकता असल्याचे नलावडे म्हणाले.
सर्व जिल्हा कार्यालये आणि परिमंडळ कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केल्यानंतर आता 14 नोव्हेंबरला निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. तर 30 नोव्हेंबरपासून बेमुदत संप करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button