breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

…तर तुमचाही दाभोलकर करू, छगन भुजबळांना धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना धमकीचं पत्र पाठवण्यात आलं आहे. जर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर तुमचाही दाभोलकर, पानसरे करु अशा आशयाची धमकी या पत्रातून भुजबळांना देण्यात आली आहे. मनुस्मृतीला विरोध केला तर तुम्हालाही जीवे मारलं जाईल असं या पत्रात म्हटलं आहे. नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’ हाऊसवर एका निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आल्याचं समजतंय. राष्ट्रवादीचे नाशिकमधील पदाधिकारी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन, यासंदर्भात तक्रार नोंदवणार असल्याची माहिती आहे.

आम्हाला मनुस्मृती नकोय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हवंय, असे भुजबळ काही दिवसांपूर्वी नागपुरात म्हणाले होते. तसेच, भुजबळांनी वेळोवेळी मनुस्मृतीचा निषेध नोंदवला आहे. धमकीचं पत्र मिळाल्याचं समजताच भुजबळ फार्मवर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोळा होण्यास सुरुवात झाली आहे. या धमकी पत्राची लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button