breaking-newsताज्या घडामोडीपुणे
डीएसकेंच्या संपत्तीचा लिलाव होणार, कोर्टाचे आदेश
डीएसके समूहाच्या गुंतवणूकदारांना दिलासा देणारा आदेश न्यायालयाने दिला आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि राज्य शासनाने जप्त केलेल्या डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढावी, असा आदेश सोमवारी न्यायालयाने दिला आहे.
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांचे नातेवाईक यांच्या ४६३ स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ठेवीदारांचे पैसे परत मिळावे म्हणून त्यांची विक्री करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
नोटीस काढल्यानंतर संबंधित संपत्तीबाबत कुणाची हरकत असल्यास त्यांनी ३ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहून आपल्या हरकती नोंदवाव्यात. त्या हरकतींचा निपटारा झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही न्यायालयाने सांगितले.