breaking-newsराष्ट्रिय

तरुणीवर ५ जणांकडून गँगरेप, पीडिता गंभीर अवस्थेत सापडली रस्त्यावर

नवी दिल्ली | दिल्लीजवळील नोएडाच्या गौतम नगर परिसरात एका मुलीवर तब्बल पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. पीडित मुलगी ही नोएडामधील सेक्टर ५१ मधील केंद्रीय विद्यालयाजवळ सापडली. तिला त्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, मुलीने ३ आरोपींची नावं देखील सांगितली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

उत्तर प्रदेशातील सेक्टर ५१ जवळ आज सकाळी एक युवती बेशुद्ध अवस्थेथ पोलिसांना आढळून आली. युवतीने पोलिसांना अशी माहिती दिली की तीन तरुणांनी तिला दिल्लीहून नोएडाला आणले आणि त्यांनी तिच्याबरोबर अनेकदा बलात्कार केला. पोलिसांनी पीडितेला जिल्हा पोलिस उपायुक्त (झोन 1) संकल्प शर्मा यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, शुक्रवारी सकाळी पोलिसांना माहिती मिळाली की सेक्टर ५१ मध्ये एक युवती बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेली होती. इथे राहणाऱ्या एका महिलेला ही युवती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती.  तिनेच पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना तात्काळ मुलीला उपचारासाठी नोएडाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button