breaking-newsमहाराष्ट्र

तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी! अमरावतीमधील संतापजनक घटना

अमरावती – कोरोना चाचणीसाठी २४ वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार अमरावतीतून समोर आला आहे. बडनेरा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी लॅब कर्मचाऱ्याला अटक करुन बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. अल्पेश अशोक देशमुख (30, रा. पुसदा, जि. अमरावती) असे या आरोपीचे नाव असून तो बडनेऱ्याच्या लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून काम पाहतो.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित 24 वर्षीय तरुणी अमरावती इथे भावाकडे राहत असून, एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपर्कातील 20 जणांचे स्वॅब 28 जुलैला ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणारा आरोपी अल्पेश देशमुख याने संबंधित मुलीला परत बोलावून तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर तरुणीने ही बाब वरिष्ठ महिला सहकाऱ्यास सांगितली. त्या दोघींनी महिला कर्मचारी नाही का, असे विचारले असता लॅब टेक्निशियनने महिला नसल्याचे सांगितले. तर तपासणी करण्यासाठी तुम्ही एका महिलेला सोबत घेऊ शकता, असेही म्हटले.

त्यानंतर टेक्निशियनने फिर्यादी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी करून तुमची टेस्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले. मात्र गुप्तांगाद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत तरुणीस शंका आल्याने, तिने त्याबाबत आपल्या भावाला सांगितले. मग भावाने डॉक्टरांना विचारल्यानंतर अशाप्रकारे चाचणी करत नसल्याचे समोर आले. त्यानंतर याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह गुन्हा दाखल केले असून मंगळवारी रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button