breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडलेख

लोकसंवाद: युवा राष्ट्रवादीचा नवा जोश…सत्ताधारी भाजपाचा उडवणार ‘होश’

विविध उपक्रमांनी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वातावरण निर्मिती

 

अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता खेूचन आणण्याचा पदाधिकारी- कार्यकर्त्यांचा संकल्प

पिंपरी । अधिक दिवे

पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘युवा राष्ट्रवादीचा नवा जोश’ पहायला मिळत आहे. त्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे ‘होश’ उडवण्याची मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महापालिकेतील सत्ता खेचून आणण्याचा संकल्प शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वादिवसानिमित्त शहर राष्ट्रवादीने विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले. संपूर्ण शहरभर गेल्या १५ दिवसांपासून कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळत आहे.

वास्तविक, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून शहरातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास दुनावला आहे. ‘‘गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे…’’ अशा विचारांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. प्रभागनिहाय कार्यक्रमांची आखणी आणि मोर्चबांधणी पहायला मिळत आहे. शहर भाजपाने समर्थ बूथ अभियान हाती घेतले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने युवक आघाडीच्या शाखा ठिकठिकाणी सुरू करण्याचा धडाका लावला आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी यात जातीने लक्ष घातले आहे. त्यामुळे आगामी काळात युवा राष्ट्रवादीचा हा नवा जोश… सत्ताधारी भाजपाचा होश उडवेल, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे. परिणामी, आगामी काळात भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांची डोकेदुखी वाढणार आहे.

युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिले संकेत…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दोन दिवसांपूर्वी शहराचा दौरा केला. त्यावेळी राष्ट्रवादी हा सर्वांत तरुणांचा पक्ष आहे, असे म्हटले होते. यासह आगामी महापालिका निवडणुकीत निश्चितपणाने पक्षश्रेष्ठी तरुणांना संधी देतील, असे भाकीत केले होते. शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी चांगली वातावरण निर्मिती केली आहे. सध्यस्थितीला श्याम जगताप यांना युवक आघाडीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपण्यात आली आहे. कार्याध्यक्ष योगेश गवळी, कुणाल थोपटे, शेखर काटे, प्रसाद कोलते, किशोर मासाळ, मयूर गायकवाड, संदीप उर्फ लाला चिंचवडे, प्रदीप कंद, विशाल काळभोर, युवती आघाडीच्या शहराध्यक्षा वर्षा जगताप यांनी आपापली खिंड लढवण्यास सुरूवात केली आहे.

आजी-माजी आमदारही सरसावले…

पिंपरी विधानसभा मतदार संघात आमदार अण्णा बनसोडे यांनी विविध उपक्रमांचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे भोसरी मतदार संघात माजी आमदार विलास लांडे यांनीही प्रभागनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. त्यामुळे आजी-माजी आमदार युवकांना साथ देवून महापालिकेवर वर्चस्व निर्माण करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आम्ही राष्ट्रवादी… गट-तट नाहीत  : संजोग वाघेरे-पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कसलेही गट-तट नाहीत. आम्ही राष्ट्रवादी म्हणून एकोप्याने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. काम करण्याच्या पद्धतीवरुन  काही मतभेद आहेत, असे प्रसारमाध्यमांमध्ये म्हटले असेल, तरी कोणाबाबतही मनभेद मुळीच नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुन्हा एकदा महापालिकेत सत्ता मिळवणार आहे, असा दावा शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button