breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

तब्बल दीड वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरू

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये मागील दीड वर्षांपासून बंद असलेली 4जी इंटरनेट सेवा अखेर सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये इंटरनेट पूर्णपणे बंद करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 हटवल्यानंतर इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

वाचा :-UN Human Rightsकडूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी ट्विट

कलम 370 हटवल्यानंतर हिंसक घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारने इंटरनेट सेवा बंद केली होती. त्यानंतर काही महिन्यांनी मर्यादित स्वरूपात 2जी इंटरनेट सेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.आता अखेर तब्बल 18 महिन्यांनंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये 4जी इंटरनेट सेवेचा लाभ घेता येणार आहे. याबाबत जम्मू आणि काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी ट्विट करून माहिती दिली. ज्यात 4 जी इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती.

4जी इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ट्विट करत म्हणाले की, नंतर आता ही सेवा पुन्हा बहाल करण्यात आली आहे.सदर भागात इंटरनेट सेवा सुरु करण्याची माहिती समोर आल्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत याबाबतचा आनंदही व्यक्त केला. 4G मुबारक, 2019च्या ऑगस्ट महिन्यानंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमघ्ये 4G मोबाईल डेटा वापरता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button