breaking-newsराष्ट्रिय

ड्रोनद्वारे फुड डिलिव्हरीसाठी Zomato ने खरेदी केली लखनऊची कंपनी

भारतात लवकरच ड्रोनच्या माध्यमातून फुड डिलिव्हरीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. ड्रोनद्वारे फुड डिलिव्हरीसाठी ऑनलाइन अॅप झोमॅटोने लखनऊची स्टार्टअप कंपनी ‘टेक-इगल इनोवेशंस’ला खरेदी केलं आहे. ही कंपनी गेल्या काही वर्षांपासून प्रामुख्याने ड्रोनच्या निर्मीतीवर काम करत आहे. टेक-इगल खरेदी करण्याचा करार किती रुपयांमध्ये झाला याबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. टेक-इगल झोमॅटोला हब-टू-हब डिलिव्हरी नेटवर्क बनवण्यासाठी मदत करेल असं झोमॅटोकडून सांगण्यात आलं आहे.

2015 मध्ये आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी विक्रम सिंह मीणा यांनी टेक इगल कंपनीची स्थापना केली. तेव्हापासून ही कंपनी ड्रोन बनवण्यावर काम करत आहे. झोमॅटोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल म्हणाले की, ‘5 किलोग्राम वजन असलेली एखादी वस्तू अगदी सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्याची क्षमता असणारे मल्टी-रोटर ड्रोन्सची निर्मीती करणं हे आमचं सर्वात पहिलं उद्दिष्ट आहे. सध्या हे प्राथमिक टप्प्यात आहे, भविष्याच्या दृष्टीकोनातून काही आवश्यक पावलं उचलण्यात आली आहेत. ऑनलाइन ऑर्डर करुन ड्रोनद्वारे डिलिव्हरी मिळण्याची अपेक्षा ग्राहक नक्कीच ठेवू शकतात’.

झोमॅटोचे 75 हजारांपेक्षा जास्त रेस्टोरंट पार्टनर्स आहेत आणि देशाच्या 100हून जास्त शहरांमध्ये फुड-डिलिव्हरीची सेवा ते पुरवतात. ऑक्टोबर 2018 मध्ये कंपनीने 2 कोटींहून जास्त ऑर्डर घेण्याचा आकडा पार केला आहे. जानेवारीमध्ये हा आकडा केवळ 35 लाख होता असा दावा झोमॅटोने केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button