breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडकरांना पालिकेत येण्यास बंदी

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहरात ‘कोरोना’ विषाणूचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने महापालिकेत येण्यास बंदी घातली आहे. मंगळवारी नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. मात्र, नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून ही उपाय योजना केल्या जात असल्याचेही आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सांगितले आहे.

कोरोना आजारापेक्षा इलाज भयंकर होवू लागला आहे. महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी सुरक्षित रहावेत, त्यांना आजारांचा संसर्ग होवू नये, म्हणून बाहेरील नागरिकांना प्रवेशास मज्जाव करण्यात आलेला आहे. तसे आदेशही आयुक्तांनी सुरक्षा विभागास दिल्याने त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येवू लागली आहे.

सद्यस्थितीत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना व अंमलबजावणीची कामे महापालिकेतर्फे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहेत. शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत महापालिका आयुक्त नागरिकांना 31 मार्चपर्यंत भेटण्यास मज्जाव केलेला आहे. तसेच अत्यावश्यक बाब असेल तर त्यांनी ई-मेल अथवा पत्राद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन केलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button