breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

ड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर

ड्रग्ज प्रकरणात बड्या कलाकारांची नावे समोर येत आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम देखील या प्रकरणात जेवढ्या खोलात जात आहे त्यात अनेक सेलिब्रिटींची नावं समोर येतच आहेत. यातलं सर्वात मोठं नाव म्हणजे दीपिका पादुकोण.. मात्र आता तिच्या नंतर धक्कादायक म्हणजे दिया मिर्झाचं नावंही समोर आलं आहे.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे जात आहे तसतसे बॉलिवूड जगतातील अनेक बड्या नावांचा खुलासा होत आहे. या प्रकरणात ड्रग्ज पॅडलर अनुज केशवानीने एनसीबीच्या चौकशीत दीया मिर्झाचं नाव घेतलं आहे. केशवानीने आपल्या जबाबात म्हटलं की दियाचा मॅनेजर तिच्यासाठी ड्रग्ज विकत घ्यायचा. यासंबंधीचे पुरावेही त्याने दिले. त्यामुळे आता एनसीबी लवकरच या प्रकरणात दिया मिर्झाला चौकशीसाठी समन्स पाठवू शकते असं म्हटलं जात आहे.

दरम्यान, मंगळवारी दीपिका पादुकोणचं नावही ड्रग्ज चॅटमध्ये समोर आलं आहे. सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांच्यानंतर दीपिकाचं नाव समोर आल्याने साऱ्यांनाच धक्का बसला होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि एका टॅलेन्ट मॅनेजमेन्ट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांना समन्स बजावले आहेत.

एनसीबीने यापूर्वी ज्या लोकांची चौकशी केली होती त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ड्रग्जसंबंधी माहिती मिळू शकेल असं म्हटलं जात आहे. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत १२ हून अधिक लोकांना अटक केली आहे. यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचाही समावेश आहे. तर अनेकांना चौकशीसाठीचे समन्स पाठवण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button