breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

डोनाल्ड ट्रम्प यांचं मुकेश अंबानी यांना दिलखुलास आणि मोठ आश्वासनं…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेले दोन दिवस भारत दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी देशातील टॉपच्या 20 कंपन्यांच्या सीईओ, चेअरमन यांच्याशी चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी उद्योजकांना वेगवेगळे प्रश्न विचारले. यावेळी रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अमेरिकेच्या उर्जाक्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्याची माहिती दिली. तसेच महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अमेरिकेमध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. यावर ट्रम्प खूश झाले. 

यानंतर ट्रम्प यांनी मुकेश अंबानी यांना ‘5 जी’ साठी काही पाऊल आहात की नाही असा प्रश्न केला. यावर मुकेश अंबानी यांनी हो असे उत्तर देत रिलायन्स ग्रुप 5 जीमध्ये चांगले काम करत आहे. ही एकमेव अशी कंपनी आहे जी चीनच्या मदतीशिवाय देशात 5 जी लाँच करणार आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेशी व्यापारामध्ये मोठी सूट मिळत असल्याचे म्हटले. यावर ट्रम्प यांनी जोपर्यंत मी आहे तो पर्यंत मिळत राहतील असे आश्वासन दिले. 


ट्रम्प यांनी यावेळी त्यांच्या विरोधकांवर टीका केली. अमेरिकेतील विरोधकांनी स्टील इंडस्ट्री बंद करून टाकली आहे. ही चांगली बाब नाही. मी आल्यानंतर अल्युमिनिअम व्यापारामध्ये चांगली वाढ झाली आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये स्टील आणि अल्युमिनिअमची मोठी गरज असते. तुम्ही यामध्ये चांगले काम करत आहात, असे आर्सेलर मित्तलचे अध्य़क्ष लक्ष्मी मित्तल यांना ट्रम्प यांनी सांगितले. 

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अमेरिकेत केलेल्या गुंतवणूकीबद्दल सांगितले. ते म्हणाले की त्यांची कंपनी अमेरिकेत पोस्टल सर्व्हिस डिलिव्हरी व्हॅन उत्पादनासाठी काम करत आहे. आतापर्यंत दहा लाखाहून अधिक व्हॅन बांधल्या गेल्या आहेत. लवकरच त्यात आणखी अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होईल. यावर ट्रम्प यांनी महिंद्रांचे अभिनंदन व आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button