breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मनसे विधानसभा उमेदवाराचा राडा, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण

अंबरनाथ | राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्षाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही मारहाणी दुसरं तिसरं कोणीनाही तर विधानसभेतल्या मनसेच्या पराभूत उमेदवारानं केल्याचं समजतं आहे. सुमेध भवार असं मारहाण करणाऱ्या मनसेच्या उमेदवाराचं नाव आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवीगाळ केल्यामुळे आपण ही मारहाण केल्याचं मनसे उमेदवारानं सांगितलं आहे. या मारहाणी प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी संध्याकाळी अंबरनाथच्या कल्पना हॉटेलच्या बाहेर अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्ष सचिन अहिरेकर याला मनसे पदाधिकारी सुमेध भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली. भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांनी अहिरेकर यांच्या डोक्यात दगड टाकला. यात ते गंभीर जखमी झाले. सध्या अहिरेकर यांच्यावर अंबरनाथच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भाजपमध्ये असलेल्या भवार यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदारसंघ शिवसेनेला गेल्यानं मनसेत जाऊन विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी भवार यांच्याकडे सचिन अहिरेकर हा स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होता. मात्र भवार मनसेत गेल्यानंतर अहिरेकर यांनी भवार यांच्याकडे काम बंद केलं होतं. तसंच अहिरेकर यांनी भवार यांचं विधानसभा निवडणुकीच्यावेळी काम केलं होतं. निवडणुकीच्यावेळी आधी रिपाइं आठवले गटाकडून विधासभेची उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी भाजपात आणि तिथे ही उमेदवारी न मिळाल्यानं शेवटच्या क्षणी मनसेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button