breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सरस्वती विद्यालयात 9 ते 12 वी चे वर्ग सुरु

पिंपरी | प्रतिनिधी

आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळाच्या श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उत्साही वातावरणात शासकीय नियमांचे पालन व अंमलबजावणी करुन इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले. या वेळी शालेय व्यवस्थापनात शासकीय नियमानुसार विद्यालयाचे सॅनिटायझेशन करून विद्यार्थी बैठक व्यवस्था, ठिकठिकाणी कोविड-19 पासून संरक्षित नियमावली व सूचना फलक लावण्यात आले. विद्यार्थी स्वागतापूर्वी विशेष अंतरावर चौकोन टाकून ओळीने विद्यार्थ्यांची ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनिग ने तपासणी करण्यात आली.

विद्यार्थ्यानी मास्क लावल्याची व सोबत हात रुमाल, पाण्याची बाटली व सॅनिटायझर असल्याची खात्री करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. वर्ग नियोजनानुसार विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर वर्ग शिक्षक व विषय शिक्षकांनी वर्गात अध्यापनास सुरुवात केली. याप्रसंगी विद्यार्थी स्वागतासाठी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक गोविंद दाभाडे, सचिव डॉ. अश्विनी दाभाडे, प्राचार्या साधना दातीर, उपप्राचार्य विजय बच्चे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे व कोकिळा आहेर व वर्ग शिक्षक, विषय शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button