breaking-newsआंतरराष्टीय

भारतीय गायकाचे गाणे गुणगुणल्याने पाकिस्तानात महिला कर्मचाऱ्यावर कारवाई

लाहोर – भारतीय गाणं गायल्याने पाकिस्तानमधील एका महिला कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. महिला पाकिस्तानमधील विमातनळ सुरक्षा दलाची कर्मचारी आहे. पाकिस्तानचा ध्वज असणारी टोपी घालून महिला भारतीय गाणं गात होती. विशेष म्हणजे, ती एका गाण्यावर फक्त ओठ हलवत होती.

मात्र यामुळे देशाचा अपमान झाल्याचं सांगत महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार, या महिला कर्मचाऱ्यास दोन वर्षांसाठी कुठलीही वेतनवाढ किंवा अधिकचे भत्ते मिळणार नाहीत. पाकिस्तानमधील विमानतळ प्रशासनाच्या या अजबगजब कारवाईमुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

महिला कर्मचाऱ्याचा गाणं गात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्याने 25 वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली. तसेच पुन्हा असा प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्याने या महिला कर्मचाऱ्यास दिले आहेत. या महिला कर्मचाऱ्याने पंजाबी गायक गुरू रंधावा यांचे हाय रेटेड गबरू हे गाणे गायले होते.

हे गाणे गातेवेळी या महिला कर्मचाऱ्याने पाकिस्तानी झेंडा असलेली टोपी परिधान केली होती. या महिलेचा गाणे गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने याप्रकरणी चौकशीचे आदेश देत महिला कर्मचाऱ्यावर ही कारवाई केली. दरम्यान, ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही भारताबद्दल प्रेम दाखवताच पाकिस्तानी नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

यापूर्वी 2016 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे कौतूक केल्यामुळे आणि आपल्या घरावर भारतीय ध्वज फडकवल्याने एका पाकिस्तानी नागरिकाला 10 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button