breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण
नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. नितीन गडकरी यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्वीट करुन सांगितलं की, “काल मला अशक्तपणा जाणवत होता. त्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणी केल्यानंतर माझी कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
नितीन गडकरी यांनी पुढे म्हटलं की, सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सोबत असून मी ठिक आहे. मी स्वत: ला वेगळं केलं आहे. मी सर्वांना विनंती करतो की जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी सावधगिरी बाळगून प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे. सुरक्षित रहा.