breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ठाण्यातील मॉल्स सुरु करण्यात परवानगी; मॉल्स आणि ठाणे रेल्वे स्टेशनवर ‘antigen testing’ करण्यास सुरुवात

ठाणे महानगरपालिकेने ठाण्यातील योग्य खबरदारी घेऊन मॉल्स सुरु करण्यात परवानगी देण्यात आली . दरम्यान शुक्रवारपासून म्हणजे 5 सप्टेंबर पासून ठाण्यातील मॉल्स आणि ठाणे रेल्वे स्टेशनवर antigen testing करण्यास सुरुवात केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला विवियाना मॉलमध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची टेस्ट करणार आहे. या टेस्टचे रिपोर्ट्स ग्राहकांना देण्यात येतील , अशी माहिती संदीप माळवी यांनी दिली आहे. सर्व मॉल्सच्या प्रवेशद्वारावर टेस्टिंग किट्स पुरवण्यात आले असल्याचंही ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.

नागरी समितीने ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सुद्धा antigen testing करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. शुक्रवारपर्यंत आम्ही आमची चाचणी क्षमता वाढवून 5000 पर्यंत नेली आहे. गुरुवारी एकूण 5052 चाचण्या करण्यात आल्या, असे माळवी यांनी सांगितले.

ऑगस्ट महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेने दिवसाला सुमारे 3000 चाचण्या केल्या. त्यापूर्वीच्या महिन्यात 2000 चाचण्या केल्या जात होत्या. त्याचप्रमाणे BMC पेक्षाही ठाण्यात अधिक कोरोना चाचण्या केल्या जात आहेत, असा दावा नागरी समितीकडून करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button