breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका विषय समित्यांच्या सदस्यांची निवड उद्या होणार

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाइन निवडणूक घेणार

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड उद्या (मंगळवारी) होणा-या सर्वसाधारण सभेत होणार आहे. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाइन निवडणूक घेण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेतील विषय समित्या 14 जून रोजी बरखास्त झाल्या होत्या. तब्बल चार महिन्यानंतर सदस्यांच्या निवड करुन पुन्हा सभापतीची निवड जाहीर करण्यात येत आहेत.

महापालिकेतील विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि कला-क्रीडा व सांस्कृतिक समित्यांची मुदत 14 जून रोजी संपली. तर शिक्षण समितीची मुदत 6 जून रोजी संपली आहे. मात्र, कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे लॉकडाउन, जमावबंदी आदेश लागू झाल्याने विषय समित्यांच्या नवीन सदस्यांची निवड होऊ शकली. त्यामुळे सर्व समित्या बरखास्त करण्यात आल्या. त्यामुळे सर्व अधिकार महासभेकडे गेले आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परस्थिती आता आटोक्यात येवू लागली आहे. शहर हळूहळू पुर्वपदावर येवू लागल्यानंतर महापालिकेच्या महासभा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाइन होवू लागल्या. त्यामुळे विषय समित्यांच्या सदस्यांची निवड देखील ऑनलाइन घेण्यास सरकारने परवानगी दिली आहे. ऑक्‍टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा मंगळवारी आहे. त्यात नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. यात सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना कोणाला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षीय संख्याबळानूसार सदस्य निवड..
महापालिकेतील प्रत्येक विषय समितीवर नऊ सदस्यांची निवड केली जाईल. त्यातून एकाची अध्यक्षपदी निवड होईल. महापालिका सभागृहातील संख्याबळानुसार नऊ सदस्यांमध्ये भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य असेल. त्या-त्या पक्षाच्या सदस्यांची नावे संबंधित पक्षाचे गटनेते सर्वसाधारण सभेत महापौरांकडे सुपूर्द करतील. त्यानंतर सदस्यांच्या नावाची घोषणा केली जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button