breaking-newsआंतरराष्टीय

ट्रम्पना हवी मेरीटवर आधारीत इमिग्रेशन सिस्टीम

वॉशिंग्टन – अमेरिकेत विदेशी नागरीकांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय असल्याची सातत्याने ओरड करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपली भाषा थोडी बदलली असून त्यांनी अमेरिका मेरीटवर आधारीत इमिग्रेशन सिस्टीम राबवण्यास उत्त्सुक आहे असे म्हटले आहे. अमेरिकेत बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्यांच्या विरोधात आपल्या प्रशासनाचे झिरो टॉलरन्सचेच धोरण असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की कुशल, हुशार आणि पात्र व्यक्तींना अमेरिकेत प्रवेश करण्यास अनुमती दिली जाईल त्यामुळे बोईंग, लॉकहीड अशा कंपन्यांना आवश्‍यक असणारे कर्मचारी त्यांना तेथे नेमता येतील. त्यासाठीच मेरीटवर आधारीत इमिग्रेशन सिस्टीम आम्ही लागू करीत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील प्रत्येक कंपनी मेरीटच्या आधारे विदेशी नागरीकांना नोकरीवर ठेऊ शकतील असे त्यांनी म्हटले आहे.

व्हाईट हाऊस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल स्पेस कौन्सिलच्या बैठकीत बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. सीमेवरून बेकायदेशीरपणे घुसखोरी करून अमेरिकेत शिरलेली माणसे देशात खून आणि चोऱ्या करतात असा आरोप त्यांनी केला. आम्हाला हा देश सुरक्षित करायचा आहे त्यामुळे अशा घुसखोरीला आमचा प्रखर विरोधच राहील पण गुणी माणसांना आम्हीं आमच्या कंपन्यांच्या गरजेनुसार अमेरिकेत प्रवेश करण्याची अनुमती देऊ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्या देशातल्या मुलांचेही भवितव्य आम्हाला सुरक्षित करायचे आहे, देशही सुरक्षित करायचा असून जगासाठी आम्हाला काही चांगले करायचे आहे. त्या धोरणानुसार आम्ही इम्रिगेशन सिस्टीम आखत आहोत. डेमोक्रॅट पक्षाने आमच्या या धोरणात अडवणुकीची भूमिका न घेता आमच्याशी चर्चा करावी आणि देशाला अनुकुल असे इमिग्रेशन धोरण तयार करण्यासाठी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button