breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधान मोदी व संरक्षणमंत्र्यांविरुद्ध कॉंग्रेस आणणार हक्कभंगाची नोटीस

नवी दिल्ली – राफेल विमानांच्या मुद्यावरून लोकसभेत आज पुन्हा एकदा भाजप आणि कॉंग्रेसमध्ये खडाजंगी झाली. सुरुवातीला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यात तोंडी वाद झाला. माजी संरक्षणमंत्री एके एंटनी सोबत कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री संसदेची दिशाभूल करत आहे. हे विशेषाधिकाराचे उल्लंघन असून याविरुद्ध कॉंग्रेस लोकसभेत हक्कभंगाची नोटीस देणार असल्याचे आनंद शर्मा यांनी सांगितले.

एके एंटनी म्हणाले कि, अनेक कंपनीच्या सल्यांनंतर डिसेंबर २०१२ मध्ये राफेल विमानाला निवडण्यात आले होते. १२६ एयरक्राफ्टचा करार करण्यात असला असूनत्यावेळी विमानाची किमत निश्चित करण्यात आली होती. परंतु मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले असता संपूर्ण करारच बदलण्यात आला. व कराराची किमत वाढली. शिवाय मोदी सरकारने अशा कंपन्यांना ही विमाने बनविण्यास दिली आहेत ज्यांच्याकडे साधे किंवा लढाकू विमाने बनविण्याचा अनुभव नाही. १२६ पैकी १८ एयरक्राफ्ट फ्रान्समध्ये बनविण्यात येणार होते. तर उर्वरित भारतातील एचएएलद्वारे बनणार होते. यामध्ये कोणताही गोपनीय करार झाला नव्हता, असे त्यांनी सांगितले आहे.

आनंद शर्मा यांनी म्हंटले कि, २०१६ मध्ये संरक्षणमंत्र्यांनी राफेल कराराची किमत सांगितली होती. तर आता का सांगितली जात नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button