breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

टेस्लाच्या मॉडेल ३ ने केला जागतिक विक्रम

नवी दिल्ली – टेस्ला या इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनीच्या मॉडेल ३ सेडान या कारने सर्वात जलद चार्जिंगचा विक्रम केला असून, त्याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे. यामुळे सन २०१५ मध्ये झालेला विक्रम मोडीत निघाला आहे.
फॉर्म्युला ई रेसिंगच्या अलेक्झांडर सीम्स, डीन फिल्डिंग आणि डेव्हीड पेईलो यांनी नुकताच या गाडीतून फेरफटका मारला.

८५५ मैलांच्या या प्रवासामध्ये या तिघांनी १ तास ३१ मिनिटे आणि ३२ सेकंद एवढाच वेळ चार्जिंगसाठी थांबण्यात घालविला. या आधी २०१५ मध्ये ३ तास ४४ मिनिटे आणि ३३ सेकंद असा सर्वात कमी वेळ नोंदविला गेला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button