breaking-newsTOP NewsUncategorizedगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अबब ! 4 दिवसांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत 1.50 कोटींचं दान

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

दोन वर्षांच्या कोरोनाच्या महामारीनंतर पुन्हा एकदा राज्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. मुंबईत प्रसिद्ध असलेला आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा पुन्हा एकदा लालबाग परिसरात विराजित झाल आहे. दोन वर्षांच्या कोरोनाच्या महामारीनंतर पुन्हा एकदा राज्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. मुंबईत प्रसिद्ध असलेला आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा पुन्हा एकदा लालबाग परिसरात विराजित झाल आहे. तसेच, या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सव सुरू होऊन चार दिवस झाले असून, लालबागच्या राजाची दानपेटी मोजण्यात आली. त्यावेळी पहिल्या चार दिवसांत तब्बल लालबागच्या राजाच्या दानपेटीत 4 दिवसांत 1.50 कोटींचे दान जमा झाल्याची माहिती समोर येत आहे.

यंदा लालबागच्या राजाने एक नवा विक्रमच केला आहे. अवघ्या चार दिवसांतच लालबागचा राजा मंडळात एक कोटीपेक्षाही अधिकची देणगी जमा झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. चार दिवसांत तब्बल दीड कोटी रुपये इतकं भरघोस दान गणेशभक्तांनी राजाच्या चरणी अर्पण केले आहे. चार दिवसांत करोडो गणेशभक्तांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. 4 दिवसात 1 कोटी 50 लाख रुपये इतके दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत जमा झाले असून, यामध्ये रोख रकमेसह नाण्यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सोने, चांदी देखील भक्तांनी अर्पण करण्यात आली आहे. जवळपास 200 टोळे सोने आणि 1700 तोळे चांदीचे दान लालबागच्या राजाच्या दानपेटी अर्पण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सव सुरू होण्याच्या एक दिवस आगोदर पासून गणेशभक्तांनी लालबाग परिसरात गर्दी केली होती. दरम्यान, लालबागच्या राजा प्रमाणेच लालबाग परिसरात असलेल्या इतर प्रसिद्ध मंडळांतील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button