breaking-newsक्रिडा

टी-20 वर्ल्डकप लांबणीवर,आता आयपीएलकडे लक्ष

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा टी-20 वर्ल्डकप स्थगित करण्यात आला आहे. अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बोर्डाने सोमवारी (20 जुलै) टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. याशिवाय, इंडियन प्रिमिअर लीगच्या आयोजनाचा मार्गही खुला झाला आहे.

“सध्याची परिस्थिती पाहता ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेचं यजमानपद स्वीकारणे जवळपास अशक्य आहे. 16 आंतराष्ट्रीय संघांसाठी व्यवस्था करणे शक्य नाही”, असं ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने मे महिन्यातच आयसीसीला सांगितलं होतं.

“आमचा देश टी-20 विश्वचषकातील संघांसाठी व्यवस्था करेल. मात्र, मुख्य मुद्दा हा आहे की प्रेक्षकांशिवाय रिकाम्या मैदानात स्पर्धेचं आयोजन करणे योग्य असेल का?”, असं ऑस्ट्रेलियाचे क्रीडा मंत्री रिचर्ड केलबेक यांनी म्हटलं होतं.

“कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात यावर्षी प्रेक्षकांसोबत टी-20 विश्वचषकाचं आयोजन करणे कठिण होतं. प्रेक्षकांविना विश्वचषक सारख्या स्पर्धांचं आयोजन करण्याचा काहीही अर्थ नाही, त्यामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे”, असं ऑस्ट्रेलियाने सांगितलं.

टी-20 वर्ल्ड कप 2020 पुढे ढकलल्यानंतर आता आयपीएलचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बीसीसीआय 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान आयपीएल सीझन 13 चं आयोजन करण्याचा विचार करीत आहे. बीसीसीआय युएईमध्ये आयपीएल सीझन 13 च्या आयोजनाचा विचार करत आहे.

श्रीलंका आणि युएईने यापूर्वीच बीसीसीआयसमोर आयपीएल सीझन 13 आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आतापर्यंत आयपीएल दोनदा भारताबाहेर आयोजित करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button