breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

टिक-टॉकने फेसबूक आणि व्हॉट्सअपलाही मागे टाकले

मुंबई | तरुणांमध्ये चांगलंच लोकप्रिय ठरलेल्या टिक टॉकने नवा विक्रम केला आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये टिकटॉक गूगल प्ले स्टोअरवर आणि अपल अॅप स्टोअरवर सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे. सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार उत्पन्न (रेव्हेन्यू) आणि वापर (इन्स्टॉल) दोन्हींमध्ये या महिन्यात टिकटॉकने बाजी मारली आहे. अशाप्रकारे आता टिक टॉक, व्हॉट्सएप आणि फेसबूकपेक्षा अधिक लोकप्रिय ठरले आहे.

सेन्सरच्या अहवालानुसार मागील महिन्यात टिकटॉक एप भारतात सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले. भारतातील एप डाऊनलोडची संख्या 4 कोटी 66 लाख इतकी आहे. ब्राझीलमध्ये हीच संख्या 97 लाख आणि अमेरिकेत 64 लाख आहे. टिक टॉकला गूगल प्ले स्टोअरवर फेब्रुवारी 2020 मध्ये जवळपास 9 कोटी 32 लाख (93.2 मिलिअन) वेळा इन्स्टॉल करण्यात आले. याआधी हे एप केवळ 1 कोटी 97 वेळा डाऊनलोड झाले होटे. टिक टॉक आल्यानंतर प्ले स्टोअर आणि एप स्टोअरवर एकूण 1.9 अब्ज वेळा इन्स्टॉल करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button