breaking-newsआंतरराष्टीय

टर्की पाकिस्तानसाठी बनवणार रडारला न सापडणारी अत्याधुनिक युद्धनौका

टर्कीने पाकिस्तानसाठी युद्धनौकेची बांधणी सुरु केली आहे. टर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान यांनी रविवारी ही घोषणा केली. पाकिस्तान टर्कीकडून ही युद्धनौका विकत घेणार आहे. एर्दोगान यांच्या हस्ते टीसीजी किनलियादा या युद्धनौकेचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानसाठी युद्धनौकेची बांधणी करत असल्याची घोषणा केली. आनाडोलु वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

युद्धनौकेची डिझाईन, बांधणी आणि देखभाल करणाऱ्या जगातील दहा देशांमध्ये टर्कीचा समावेश होतो असे एर्दोगान म्हणाले. रविवारपासून पाकिस्तानसाठी युद्धनौकची बांधणी सुरु झाली असून त्याचा पाकिस्तानला फायदा होईल. आपल्या नौदलाचा संपन्न, गौरवशाली विजयाचा वारसा पुढे नेऊ, अधिक बळकट करु असे एर्दोगान म्हणाले.

जुलै २०१८ मध्ये पाकिस्तानी नौदलाने MILGEM श्रेणीच्या चार युद्धनौका खरेदी करण्यासाठी टर्की बरोबर करार केला. या श्रेणीच्या युद्धनौकांचे वैशिष्टय म्हणजे त्या रडारला सापडत नाहीत असे आनाडोलुने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तानी नौदलाचे कमांडर अॅडमिरल झफर महमूह अब्बासी आणि एर्दोगान या दोघांनी युद्धनौका बांधणीच्या कामाचे उद्घाटन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button