breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

टकटक टोळीकडून संगीतकार डबू मलिक यांची लूट

मुंबई : संगीतकार डबू मलिक यांचा आयफोन १० मॅक्स मोबाइल ‘टकटक’ टोळीने लांबवला. हा प्रकार शनिवारी जुहू तारा रोड येथे घडला.

मलिक आपल्या मर्सिडीज कारमधून प्रवास करत होते. वाहतूक खोळंबलेली असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या कारजवळ आल्या. त्यांनी बोलण्यात गुंतवून कारच्या डाव्या बाजूला ठेवलेला महागडा मोबाइल मलिक बेसावध असताना चोरला. या प्रकरणी जुहू पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला. या परिसरात अशा प्रकारे आणखी गुन्हे घडले असून पोलीस या टोळीचा शोध घेत आहेत.

एकटी व्यक्ती असलेल्या कार ही टोळी लक्ष्य करते. सिग्नल, वाहतूक खोळंब्यात किंवा रस्त्याकडेला थांबलेल्या कारजवळ दहा रुपयांच्या नोटा टाकून या तुमच्या का, असे विचारले जाते. चालक खिडकीची काच उतरवून खाली पाहतो तेव्हा डाव्या बाजूला ठेवलेल्या वस्तू अन्य व्यक्ती अलगद उचलून पोबारा करतो. गाडीच्या मागच्या बाजूला थाप मारूनही चोरी केली जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button