breaking-newsराष्ट्रिय

झारखंडमध्ये चकमकीत 5 नक्षलवादी ठार; एका जवानाला वीरमरण

झारखंडमध्ये आज(दि.2) सकाळी सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. मात्र, यात एक जवान देखील शहीद झाला असून अन्य चार जवान जखमी झाल्याची माहिती आहे.

ANI

@ANI

Superintendent of Police, Y S Ramesh : In an encounter with Naxals in Dumka, 1 jawan has lost his life and 4 others are injured. According to our information 4-5 Naxals have been shot. pic.twitter.com/f5yjENH6zH

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter
33 people are talking about this

झारखंडच्या डुमका येथे रानेश्वर ठाण्याच्या हद्दीत कठलियाजवळ ही चकमक उडाल्याची प्राथमिक माहिती आहे. शिकारीपाडा आणि रानेश्वर ठाण्याच्या हद्दीतील जंगलात काही नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तेथे शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. शोधमोहीम सुरू असतानाच लपलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला, त्यांना जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. जवानांच्या प्रत्युत्तरात चार ते पाच नक्षलवादी ठार झाले. पण दुर्दैवाने एक जवान देखील शहीद झाला आणि अन्य चार जवान शहीद झाले. गंभीर जखमी झालेल्या एका जवानाला हेलिकॉप्टरनं रांची येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. तर अन्य जखमी जवानांवर डुमका येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरात  शोधमोहीम अद्यापही सुरू आहे. पोलीस अधीक्षक वाय. एस. रमेश यांनी याबाबत माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button