breaking-newsराष्ट्रिय

झारखंडच्या नारायणपूरमध्ये नक्षली हल्ल्यात जवानाला वीरमरण

रांची – झारखंडच्या नारायणपूर जिल्ह्यातील करिया मेटा येथे नक्षलवाद्यांनी छत्तीसगड सशस्त्र पोलीस दलाच्या छावणीवर गोळीबार करून हल्ला केल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजता घडली. या हल्ल्यात एका जवानाला वीरमरण आले असून या जवानांचे जितेंद्र बागडे असे नाव आहे.

करिया मेटा छावणीवर सकाळी नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार करून हल्ला केला. यावेळी जवानांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात जवान शहीद झाला. सध्या छत्तीसगडमध्ये सशस्त्र दलाची अतिरिक्त तुकडी दाखल झाली आहे.

दरम्यान, कांकेरच्या ताडोनी ठाण्याच्या क्षेत्रात नक्षलवाद्यांनी फलक लावले आहेत. यामध्ये पोलिसांबरोबर चकमकीत मृत्यू झालेल्या नक्षलवाद्यांचे फोटो आणि त्यांच्याविषयी पत्रकात नमूद केले आहे. नक्षलवाद्यांनी 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत शहीद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले. परिसरात नक्षलवाद्यांनी बॅनर लावलेले समजताच पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध अभियान सुरू केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button