breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

ज्योत्स्ना शिंदे यांच्याकडून भाऊसाहेब तापकीर शाळेची फसवणूक, बडतर्फ मुख्याध्यापिकांना दिले पाठबळ

  • बडतर्फ कर्मचा-यांच्या वेतनासाठी शिंदेंनी केला अधिकाराचा गैरवापर
  • शिक्षण आयुक्त, पालिका आयुक्तांकडे कारवाई करण्याची केली मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भाऊसाहेब तापकीर शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात जाऊन बेकायदेशीरपणे काम करणा-या मुख्याध्यापिका जयश्री पवार आणि उल्का जगदाळे यांना कामावरून काढून टाकण्यात आले. तरी, दरम्यानच्या कालावधीचे वेतन काढून घेण्यासाठी त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी अधिकाराचा गैरवापर करून तसा आदेश काढला. चुकीचे कामकाज करणा-या पवार आणि जगदाळे यांच्याशी अर्थपूर्ण संबंध जोपासून अधिकाराचा गैरवापर केल्याने शिंदे यांचे चुकीचे कामकाज चव्हाट्यावर आले आहे.  

काळेवाडी येथील भाऊसाहेब तापकीर शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पवार यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांनी स्वाक्षरीचे अधिकार बेकायदेशीरपणे शिक्षिका उल्का जगदाळे यांच्याकडे दिले. शाळा व्यावस्थापनाच्या परस्पर केलेले चुकीचे कामकाज संस्थाचालकांच्या लक्षात आल्यानंतर दोघींवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. या दोन्ही बडतर्फ कर्मचा-यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी वेतनाचे अधिकार प्राप्त करून देण्यास अधिकारांचा गैरवापर केला. बेकायदेशीर कामकाज करणा-या मुख्याध्यापिकांना पाठीशी घालण्यासाठी त्यांच्याशी अर्थपूर्ण संबंध जोपासणा-या ज्योत्स्ना शिंदे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे.

यासंदर्भात बोलताना मच्छिंद्र तापकीर म्हणाले की, संस्था अध्यक्ष व शिक्षणखात्याच्या आदेशानंतरही प्रभारी मुख्याध्यापिका जयश्री पवार यांनी शाळेतील आठ कर्मचाऱ्यांना शाळेत रुजू करून घेतले नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर पवार यांनी परस्पर सदर पदाची जबाबदारी उपशिक्षिका उल्का जगदाळे यांना दिली. बेकायदेशीर पदभार स्वीकारल्याबद्दल जगदाळे यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करत त्यांनाही बडतर्फ करण्यात आले. दरम्यान, पवार आणि जगदाळे यांनी शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे यांच्याशी संगनमत करून बडतर्फ असतानाही वेतनाचे अधिकार प्राप्त करून घेतले असल्याची तक्रार मच्छिंद्र तापकीर यांनी शिक्षण विभाग व आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती.

आर्थिक गुन्हे शाखेने सदर प्रकरण शिक्षण आयुक्तांकडे वर्ग केले आहे. शिक्षण आयुक्तांनी निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी तापकीर यांनी केली आहे. तसेच, जोत्स्ना शिंदे यांच्यावर योग्य कारवाई न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल व न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील, असा इशाराही तापकीर यांनी यावेळी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button